मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकरी बांधवांना आणि गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. ने सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे.

बँकेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांचा धनादेश आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी बँकेच्या या सामाजिक कार्याचे कौतुक करताना भावना व्यक्त केल्या की, “संकटाच्या काळात समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत मदतीसाठी पुढाकार घेणे, हीच सहकार क्षेत्राची खरी आणि महत्त्वपूर्ण भूमिका आहे.” त्यांनी या उदात्त योगदानाबद्दल बँकेचे मनापासून आभार मानले.

या प्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. हसन मुश्रीफ साहेब, चिपळूण-संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार श्री. शेखर निकम साहेब, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष श्री. बाबाजीराव जाधव, संचालक श्री. अजितराव यशवंत राव, श्री. राजेंद्र सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.