चिपळूण (प्रतिनिधी) : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध आजारांचे वेळेत निदान होऊन नागरिकांना योग्य उपचार मिळावेत, या उद्देशाने चिपळूण येथील अपरांत मल्टीस्पेशालिटी अँड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे १५ ते २५ जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या विशेष पावसाळी आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ बुधवार दि.१५ जूलै रोजी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अब्बास जबले यांच्या हस्ते फीत कापून उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या विशेष शिबिरामध्ये केवळ ₹२५० मध्ये तज्ज्ञ फिजिशियन यांचे मार्गदर्शन, रक्तदाब तपासणी, ऑक्सिजन (SpO₂) तपासणी, वजन व बीएमआय (BMI) मोजणी तसेच ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे आदी पावसाळी आजारांबाबत वैद्यकीय सल्ला दिला जाणार आहे. तसेच शिबिरासाठी नोंदणी करणाऱ्या रुग्णांसाठी ईसीजी (ECG) व रक्तशर्करा तपासणी मोफत करण्यात येणार आहे. शिबिरादरम्यान सोनोग्राफी, एक्स-रे, सीटी स्कॅन तसेच विविध रक्त तपासण्यांवर २० टक्क्यांपर्यंत विशेष सवलत देण्यात येणार आहे. याशिवाय व्हायरल ताप, डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, लेप्टोस्पायरोसिस, पोटाचे विकार, सर्दी-खोकला, न्यूमोनिया, त्वचारोग तसेच सांधेदुखी व अस्थिरोग यांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला व उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत
अपरांत मल्टीस्पेशालिटी अँड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अनुभवी फिजिशियन, जनरल सर्जरी, अस्थिरोग, स्त्रीरोग, बालरोग आणि त्वचारोग विभागांसह अत्याधुनिक आयसीयू, आधुनिक निदान सुविधा व २४ तास आपत्कालीन सेवा उपलब्ध असून रुग्णाभिमुख सेवेमुळे या हॉस्पिटलने परिसरातील नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.
या विशेष पावसाळी आरोग्य तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अपरांत मल्टीस्पेशालिटी अँड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.अधिक माहिती साठी संपर्क:
७९९८८९८९८९, ७९९८७३७३७३, (०२३५५) २५४३४५ / २५४२५४.येथे करावा.