चिपळूण : महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी मंजूर केलेल्या ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीबाबत सावर्डे येथे सविस्तर चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी मंजूरी मुळे आणि महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू झालेली ही योजना ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकरी महिलेसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे, यामुळे महिलांना शेतकरी म्हणून स्वतंत्र ओळख मिळणार आहे.ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढवणे आणि त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या प्रमाणपत्राच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना शासकीय योजना, कृषी कर्ज, सबसिडी (अनुदान) आणि विविध कृषी प्रशिक्षणांमध्ये प्राधान्य मिळणार आहे.”महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक जुलै २०२६ मध्ये विधिमंडळात एकमताने मंजूर झाल्याबद्दल आणि या ऐतिहासिक विधेयकासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे रत्नागिरी जिल्हा परिषद सभागृह येथे जि.प. सदस्या सौ.पूजा शेखर निकम यांनी जिल्हा परिषदेच्या जीबी मीटिंगमध्ये अभिनंदन ठराव मांडण्यात आला.या चर्चेत निकम यांनी उपस्थित कृषी सहाय्यक, ग्राम विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्यासोबत योजने बाबत सविस्तर चर्चा केली. गावातील पात्र शेतकरी महिलांचा परिपूर्ण सर्व्हे करून, योग्य निकषांनुसार या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.या चर्चेला ग्राम विस्तार अधिकारी श्री.स्वप्निल कांबळे, कृषी सहाय्यक श्रीमती पाकळे, ग्रामसेवक श्री. पत्याने, पंचायत समिती सदस्य शौकत भाई मागजनकर, आणि सावर्डे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य देवराज गरगटे यांच्यासह इतर पदाधिकारी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
