मंडणगड – अनंत चतुरदशी ला शहरातील कुणबी भवनच्या बप्पाची भव्य मिरवणुक काढण्यात आली भिंगळोली येथील पोलीस वसाहतीचे गणेश मुर्ती विसर्जनाचे मिरवणूकीने २६ सप्टेंबर २०२६ रोजी तालुक्याचे गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. अनंत चतुदर्शीला बाणकोट पोलीस स्थानकाचे हद्दीत 2 सार्वजनीक तसेच अनेक खाजगी, मंडणगड पोलीस स्थानकाचे हद्दीत 03 सार्वजनीक व अनेक खाजगी गणेशमुर्तीचे शांततेत व भक्तीपुर्ण वातवरणात विसर्जन करण्यात आले.
मंडणगड तालुका कुणबी समाज सेवा संघाचे गणेशमुर्तीचे २१ किलोमीटर लांबीचे विसर्जन मिरवणुकीस सकाळी अकरा वाजता सुरुवात करण्यात आली. पांरपारीक खालु बाजूचे तालावर आयोजीत करण्यात आलेल्या या मिरवणुकीत तालुक्यातील कुणबी समाज बांधव व गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. चिंचघर येथे भारजा नदी मध्ये गणरायाचे मोठ्या भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. पालघर येथील सार्वजनीक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मुर्तीचे भारजा नदीत विसर्जन करण्यात आले तर म्हाप्रळ येथील नवतरुण सार्वजनीक गणेशोत्सव मंडळाच्या मुर्तीचे सावित्री नदीत विसर्जन करण्यात आले. मिरवणुकीचे कार्यक्रम शांततेत संपन्न व्हावेत याकरिता मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरत धुमाळ व बाणकोट सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तालुका होमगार्ड समादेशक प्रदीप मर्चंडे याच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तालुक्यातील पालघरवाडी गणेशोत्सव मंडळाने यंदाही जिल्हा व राज्यस्तरावरी विविध स्पर्धेत सहभागी होऊन पारितोषीके मिळवत तालुक्याचा लौकीक वाढविला आहे. त्यामुळे या गणेशोत्सवास मंडळाचा मिरवणुकीत उत्साह दिसून आला.
कुणबी भवनच्या राजाची भव्य मिरवणुक… पोलीस वसाहतीचे विसर्जनाने गणेशोत्सवाची सांगता…
