पेण (प्रशांत पोतदार) : शहरातील प्रसिद्ध श्री विश्वेश्वर मंदिरातील शिवपिंडीचा अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या रूपातील श्रृंगार करण्यात आला आहे. गुरुवार असल्याने मंदिरातील सेवेकरी टीमने शिवपिंडीवर स्वामी समर्थ महाराजांचा प्रसन्नवदनी मुखवटा तयार करून फुलांनी सजावट केली आहे.

श्री विश्वेश्वर शंकराचे हे मंदिर पुरातन पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. या मंदिरातील शिवपिंडीवर श्रीरामांनी भोगावती नदीचे पाणी आणून अभिषेक केल्याची आख्यायिका आहे. दररोज शिवपिंडीचा वेगवेगळा श्रृंगार करण्यात येतो. विठ्ठल, पाली बल्लाळेश्वर, श्रीकृष्ण, श्री गणेश, महाकाल आदी रूपांतील श्रृंगार केले जातात. भाविकांच्या दर्शनासाठी दररोज सकाळी कल्पेश शहा, गजानन पाटील व सेवेकरी टीम श्रृंगार करतात. सोमवारी सकाळी ७ वाजता सप्तआरती होते.