सिंधुदुर्ग : जिल्ह्यात यंदा कडक उन्हाळा जाणवत असल्याने संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने विशेष कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात जिल्ह्यातील ३२५ वाड्यांचा समावेश करण्यात आला असून विविध उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली आहे.
यंदाच्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सतर्क झाला आहे. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विभागाने विशेष कृती आराखडा तयार केला असून त्यामध्ये जिल्ह्यातील ३२५ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे.या आराखड्यानुसार विहिरींमधील गाळ उपसा, विहिरींची दुरुस्ती, नळपाणी योजनांची दुरुस्ती तसेच विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
