चिपळूण : ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त ध्वजवंदन कार्यक्रम चिपळूणमध्ये उत्साहात पार पडला. पक्षाची मुख्य भूमिका प्रभावीपणे पार पाडणाऱ्या बूथ अध्यक्षांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली.

यामध्ये दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उत्तर जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे, गटनेते शशिकांतजी मोदी, शहराध्यक्षा तथा सभापती रसिका देवळेकर, युवा शहराध्यक्ष तथा सभापती शुभम पिसे, उपनगराध्यक्षा रुपालीताई दांडेकर, नगरसेवक संदीप भिसे, नगरसेविका वैशालीताई निमकर, नगरसेविका अंजलीताई कदम, नगरसेविका शीतल रानडे, जिल्हा संयोजक योगेश शिर्के, शहर संयोजक नरेंद्र बेलवलकर तसेच जिल्हा व शहरातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमास नगराध्यक्ष उमेश सकपाळ तसेच शिवसेनेचे सर्व सभापती व नगरसेवक यांनीही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमादरम्यान पक्ष संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच तळागाळातील कार्यकर्ते आणि बूथ पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.