चिपळूण वार्ताहर – भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त विविध समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या वेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी प्रवेश कत्यांनी ज्या विश्वासाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे, तो विश्वास नक्कीच आम्ही जपू असे सूचित केले.
​भारतीय जनता पार्टीच्या वर्धापनदिनानिमित्त कडवेकर हाऊस चिपळूण शहर मंडल च्या वतीने नुकत्याच झालेल्या सोहळ्यात सौ. संगीता पालकर, सौ. श्रुती जोशी, सौ. शिल्पा वरपे, श्री. प्रशांत पोतदार, श्री. मंदार जोशी यांनी भाजप मध्ये प्रवेश करून भाजपचे पूर्णपणे काम करण्याचे अभिवचन दिले आहे. यांचे स्वागत पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, शहराध्यक्ष शशिकांत मोदी, महिला मोर्चा शहराध्यक्ष रसिका देवळेकर, युवाध्यक्ष शुभम पिसे, नगरसेविका अंजली कदम, माजी नगरसेवक विजय चितळे, चिपळूण अर्बन बँक संचालक समीर टाकळे, अभय चितळे, महेश दीक्षित यांनी केले. सौ. पालकर यांनी भाजपचे काम करताना आनंद वाटेल व भाजपचे ध्येय धोरण तळागाळातील नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करेन असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेविका शितल रानडे यांनी केले