चिपळूण: गुहागर तालुक्यातील कलमुंडी येथे आयोजित भव्य बैलगाडा शर्यतीमध्ये खेर्डी देऊळवाडीच्या आई सुखाई नाद खुळा ग्रुप आणि सचिन शेठ फाळके यांच्या बैलगाड्याने प्रथम क्रमांक पटकावत दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे खेर्डी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून संपूर्ण गावाची मान अभिमानाने उंचावली आहे. विशेष म्हणजे या विजयात स्वामी बैलाच्या दमदार कामगिरीनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या उल्लेखनीय यशाबद्दल आज भारतीय जनता पार्टी खेर्डी विभागाच्या वतीने विद्यमान पंचायत समिती सदस्य श्री. विनोदजी भुरण व भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सचिन शेठ फाळके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन सचिन शेठ फाळके आणि नाद खुळा ग्रुपचे विशेष अभिनंदन केले. तसेच त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी संतोषजी उतेकर, निलेश भुरण, विनय बाळा दाते, अनिल लांजेकर, श्रीधर भुरण, अभिन भुरण यांच्यासह स्वप्नील फाळके, विशाल फाळके, रमेश फाळके, शंकर फाळके, रोशन फाळके, कृष्णा राणे, सदानंद फाळके, कल्पेश राणे, कौशल फाळके आदी स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या दैदिप्यमान यशाबद्दल संपूर्ण मौजे खेर्डी गावातून आई सुखाई नाद खुळा ग्रुप, सचिन शेठ फाळके आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.