खोपोली: खालापूर तालुक्यातील खांबेवाडी येथे आमच्या पूर्वजांच्या जमिनीवर स्थानिक एजंट यांच्या मदतीने शासकीय यंत्रणावर दबाव टाकून बेकायदेशीर पद्धतीने आमची जमीन हडप करण्याचा जोरदार प्रयत्न करीत असताना आम्ही तेवढाच त्यांना विरोध करीत असतानाही शासकीय यंत्रणा मग ते महसूल असो वा पोलीस यंत्रणा आम्ही विनंती करू नं हीं आम्हाला सहकार्य करीत नसल्याचा घनाघाती आरोप कांबळे कुटुंबियांनी पत्रकार परिषदेत केला. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आमच्या पूर्वजांच्या जमिनीतच आत्मदहन करीत असल्याचे घोषणा कांबळे कुटुंबियांनी पत्रकार परिषदेत केली.
खालापूर तालुक्यात जमिनीला सोन्याचा भाव आल्याचे बोलले जात आहे त्यामुळे येथील स्थानिक नेते एजंटाच्या भूमिकेत वावरत आहे व गोरगरीब शेतकऱ्याला दबाव तंत्र करून जमीन हडप करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे कांबळे कुटुंबियांनी बोलताना सांगितले. आमच्याकडे जमिनीचे सर्व कायदेशीर कागदपत्रे आहेत व ती आम्ही स्थानिक भूमापन अधिकारी त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस यंत्रणा यांच्याकडे सादर करू न हीं आमच्या विनंतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कांबळे कुटुंबीयांनी केला, खालापूर तालुक्यातील खांबेवाडी येथे आमच्या पूर्वजांची शेत जमीन असून येथील कथित स्थानिक ुढार्‍यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून महसूल विभागावर दबावतंत्र करून आमची पूर्वपरवानगी न घेता त्या जमिनीची मोजमाप करण्यात आली आहे. रायगडच्या खासदार महोदयांनी खालापूर भूमापन अधिकाऱ्यांना सात दिवसात मोजमाप करावी अशा आशयाचे पत्र दिल्याचे व त्याची कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सादर केली. आमच्याकडून दबाव तंत्राला विरोध होत असल्याचे पाहिल्यानंतर मुंबईच्या विकसकाने बाऊन्सरच्या मदतीने आमच्यावर दबाव तंत्र व वेगवेगळी यंत्रणाच्या मार्फत आमच्यावर दबाव टाकीत आहेत व सदरची जमीन विकण्यासाठी वेगवेगळी यंत्रणेच्या मदतीने आम्हाला भाग पाडत आहे याबाबत आम्ही संबंधित भूमापन अधिकारी त्याचप्रमाणे स्थानिक पोलीस यंत्रणा यांच्याकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या परंतु आजपर्यंत आमच्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचाही आरोप कांबळे कुटुंबियांनी पत्रकार परिषदेत केला. आमच्यावर वरून दबाव येत असल्याचा शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे कांबळे कुटुंबियांनी माहिती दिली यावेळी त्यांनी रायगड जिल्ह्यातील खासदार त्याचप्रमाणे विद्यमान मंत्रिमंडळातील एका मंत्राच्या नावाचा धक्कादायक उल्लेख केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले. जात आहे आपल्या शेतात आदिवासी मजूर घुसून काम करीत असल्याने आपण त्यांना विनंती करून आमच्या जागेतून जा असे अनेकदा सांगितले परंतु समोरील विकासाकाकडून आदिवासी मार्फत आमच्यावर दबाव तंत्र वापरत आहे जेणेकरून आमच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याचा भंग कसा होईल याकडे पूर्णपणे विकसक वेगवेगळे धक्कादायक तंत्र वापरणे सुरू ठेवले आहे मात्र आपण व आपली जमीन कायदेशीर मार्गाची असल्याने आपण त्यांना वारंवार विनंती करीत आहोत पण मंत्र्याच्या दवाखाली शासकीय यंत्रणा काम करीत असल्याचाही कांबळे कुटुंबियांनी गंभीर आरोप केला. जर आपणास याबाबत न्याय मिळाला नाही तर आपण सर्व कांबळे कुटुंबीय आत्मदहन करीत असल्याचा आहे पुनरच्या त्यांनी केला. आपण मोठ्या दबावाखाली असून आपल्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर या प्रकरणातील संबंधित जबाबदार असतील असे त्यांनी सांगितले या पार्श्वभूमीवर सध्या शासकीय यंत्रणा खासदार व मंत्र्यांच्या दबावाखाली वावरत आहेत का असाही प्रश्न या निमित्ताने उभा राहत आहे. मात्र कांबळे कुटुंबीयांनी पत्रकार परिषद सांगितल्याप्रमाणे ते मोठ्या दबावाखाली आहेत हे दिसून आले.