नवी दिल्ली : राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडला असून, अनेक भागांत दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी काही तालुक्यांचा समावेश केला आहे. शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत देण्याची घोषणा केली. मात्र, ही मदत अपुरी आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की,आम्हाला दुष्काळाच्या परिस्थितीत राजकारण आणायचे नाही. हा माणुसकीचा विषय आहे. त्यामुळे या संकटाच्या काळात आमची भूमिका सहकार्याची आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचीच राहील.आमची आणि शेतकऱ्यांची मागणी आहे की, हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी. ना हमीभाव मिळत आहे, ना शेतीची सामग्री स्वस्त आहे. शेतीची सर्व सामग्री महाग झाली असताना, पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांचे किती प्रश्न सुटतील ?दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी.केवळ पाच हजार रुपये देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, असे सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,नमो किसान सन्मान योजनेअंतर्गत दरवर्षी मिळणारे पैसे शेतकऱ्यांना मिळाले आहेत का? जर हे पैसे अद्याप मिळाले नसतील, तर ते कधी दिले जाणार? आणि पैसे वितरित केले असतील, तर राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना ते मिळाले आहेत का? याची सविस्तर माहिती सरकारने द्यावी. असे सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना स्पष्टपणे सांगितले आहे.
पुढे बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,महाराष्ट्र सरकारच्या ‘आनंदाचा शिधा’ या योजनेची सद्यस्थिती काय आहे,आता दिवाळी-दसरा आला आहे. महागाई वाढलेली असताना, आनंदाचा शिधा देण्याची चर्चा का होत नाही? उत्तर प्रदेशमध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून नागरिकांना अन्नधान्य दिले जाते. त्याचप्रमाणे, अडचणीच्या काळात महाराष्ट्रातील कष्टकरी आणि गरिबांनाही अन्नधान्य द्यावे, अशी आमची मागणी आहे. अशी मागणी सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे.
यावर सविस्तर बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,पहलगाम हल्ल्यावेळी आदरणीय शरद पवार साहेब देशहितासाठी सरकारसोबत उभे राहणारे पाहिले नेते होते. अशीच आमची भूमिका दुष्काळातही आहे,जलजीवन मिशनचे पैसे गेले कुठे? त्याचे ऑडिट होणार नाही का? नागरिकांच्या करातून जमा झालेल्या पैशांतून होणाऱ्या कामांचा हिशोब मिळाला पाहिजे,जलयुक्त शिवार योजनेत कोट्यवधी रुपये खर्च केले. या योजनेचे मोठे कौतुक झाले, तरी आज दुष्काळ का पडला, याचे आत्मचिंतन करायला नको का? खर्च केलेले कोट्यवधी रुपये गेले कुठे?असे सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्टपणे बोलताना म्हटले आहे.
