दापोली : दापोली शिक्षण संस्था संचालित ए.जी. हायस्कूलच्या १९ वर्षाखालील मुलींच्या कबड्डी संघाने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला असून या संघाची सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सदरची स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आयोजित जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी व रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या होत्या.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा मार्गदर्शक श्री. प्रदीप शिगवण, कु.प्रिया केतकर,शिवम भांबुरे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेच्या नियामक मंडळाचे चेअरमन डॉ.प्रसाद करमरकर, कार्यवाह डॉ. विनोद जोशी, शालेय समिती चेअरमन श्री.रवींद्र कालेकर, मुख्याध्यापक श्री.शरद कांबळे, उपमुख्याध्यापक श्री. मगदूम एस.आय., पर्यवेक्षक श्री. अनिल पेटकर, सौ.सोनाली मेहंदळे, तसेच शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग यांनी विशेष कौतुक केले आहे.