दापोली :- दापोली तालुका व्यापारी संघटना महिला विभागातर्फे नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे आयोजन दापोली तालुक्यातील श्री प्रीतिवर्धन मंगल कार्यालय जालगाव येथे १४ ऑक्टोबर बुधवार रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत करण्यात आले होते.
दापोली तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रणाली वालावलकर, पूजा चव्हाण, सारीका गुजराथी,नीलम जाधव,प्रणाली गुरव ,माधुरी विचारे,समिधा मेहता
साक्षी बेंडल आणि डॉ. रश्मी जोशी या नवदुर्गांचा सन्मान सामाजिक कार्यकर्त्या श्रेयाताई योगेश कदम आणि दापोलीच्या नगराध्यक्ष कृपाताई घाग , उपसभापती पंचायत समिती दापोली नम्रता तोडणकर आणि जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.
आपल्या मार्गदर्शन पर भाषणामध्ये श्रेयाताई म्हणाल्या सर्वत्र उद्योजक मेळावे पहायला मिळतात पण आज नवरात्र उत्सवानिमित्त उद्योजिका मेळावा, महिला नवदुर्गांचा सन्मान कार्यक्रमात येण्याची संधी मिळाली खूप मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी मनापासून नमूद केलं. आणि दापोली तालुका महिला उद्योजकांच्या सतत नामदार योगेश दादा आणि मी पाठीशी राहू असे आश्वासित केले.
या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य किशोर भाई देसाई, दापोली पंचायत समिती सदस्या नम्रता तोडणकर, दापोली तालुका व्यापारी संघटनेच्या महिला विभागाच्या अध्यक्षा कविता मालू, सचिव अस्मिता परांजपे, खजिनदार आश्लेषा फाटक त्याचप्रमाणे दापोली तालुका व्यापारी संघटनेचे सचिव मिलिंद शेठ , तालुका व्यापारी संघटनेचे खजिनदार मयुरेश फाटक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोमती अमृते यांनी तर प्रास्ताविक सचिव अस्मिता परांजपे यांनी केले. महिला विभाग अध्यक्ष कविता मालू यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले केल्यानंतर तालुका सचिव मिलिंद शेठ यांनी आभार व्यक्त केले. रेणू सावंत यांच्या पसायदान सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली .
कार्यक्रम यशस्वितेकरिता महिला विभाग कमिटी मेंबर यांनी विशेष परिश्रम घेतले.
या नवदुर्गा सन्मान सोहळ्यासाठी दापोली तालुक्यातील व्यापारी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .