चिपळूण : चिपळूणचे नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळागौर स्पर्धा, प्रो गोविंदा, अन्य सामाजिक उपक्रम, तसेच प्रथमच भव्य राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या विविध कार्यक्रमांमुळे चिपळूण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शिवसेना शहरच्या वतीने इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे दुपारी ३ वाजता मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या शुभेच्छा पत्नी श्रेया कदम उपस्थित राहणार आहेत. मंगळागौर स्पर्धेच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना आणि पारंपरिक सांस्कृतिक परंपरांना व्यासपीठ मिळणार आहे.
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूणमध्ये प्रथमच भव्य राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ वाजता चिपळूण नगर परिषद जलतरण तलाव, रामतीर्थ तलावाजवळ, चिपळूण येथे होणार आहे. याबरोबरच अन्य सामाजिक उपक्रमाचेही आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांमधून सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
चिपळूणमध्ये प्रथमच होत असलेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसह मंगळागौर, प्रो गोविंदा आणि कन्या सामाजिक उपक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, तसेच सर्व कार्यक्रमांची शोभा वाढवावी, असे आवाहन चिपळूण शहर शिवसेना आणि शिवसेना शहर महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
