मंडणगड : मंडणगड तालुक्यातील दाभट गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी संकेश कासारे यांची निवड करण्यात आली.
या निवडीच्या वेळी ग्रामसेवक कावेरी सुवॅ, पोलीस पाटील मुराद तांडेल, आशा सेविका कल्पना मोहिते, अंगणवाडी सेविका प्रतिभा कासारे तसेच ग्रामस्थ प्रमोद कासारे, विजय कासारे, अंकुश कासारे, गौतम कासारे आदी मान्यवर उपस्थित होते.
गावातील वाद-विवाद सामोपचाराने मिटवून गावात शांतता व सलोखा निर्माण करण्यासाठी तंटामुक्त समितीची भूमिका महत्त्वाची असते. नवनिर्वाचित अध्यक्ष संकेश कासारे यांच्या माध्यमातून समितीच्या कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
दाभट तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी संकेश कासारे यांची निवड…
