चिपळूण : चिपळूण एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्र हायस्कूल चिपळूण अँड ए. ई. कालसेकर ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘हर घर तिरंगा अभियान’ उत्साहात सुरू करण्यात आले. अभियानाच्या पहिल्या दिवशी संस्थेच्या परिसरात झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी पुअर बॉईज कमिटीचे चेअरमन मोहम्मद भाई फकीर तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत व्हावी आणि तिरंग्याबद्दल आदर व अभिमान निर्माण व्हावा, या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखत स्वातंत्र्यदिनाचा उत्साहाने सहभाग घ्यावा, तसेच राष्ट्रीय एकात्मता आणि देशप्रेमाची भावना अधिक दृढ करावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.