बारामती – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार आज बारामती दौऱ्यावर असून, त्यांनी भल्या पहाटेच बारामती शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत त्यांनी कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
विकासकामे वेळेत पूर्ण होण्यासोबतच ती दर्जेदार आणि टिकाऊ असली पाहिजेत. कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून निर्धारित वेळेत विकासकामे पूर्ण करावीत, तसेच कामांच्या गुणवत्तेवर काटेकोरपणे लक्ष द्यावे, अशा स्पष्ट सूचना सुनेत्रा पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
लोकनेते अजितदादांच्या कार्यशैलीप्रमाणे पहाटेपासूनच विकासकामांचा प्रत्यक्ष आढावा घेत सुनेत्रा पवार यांनी बारामतीच्या विकासकामांना गती देण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.