बारामती – माळेगावमध्ये लोकनेते दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अनोख्या पद्धतीने उजाळा देण्यात आला. अजितदादांच्या छायाचित्राचा सुंदर कंदील तयार करण्यात आला असून, त्याचे पूजन त्यांचे सुपुत्र युवानेते जय अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपस्थित असलेल्या एका आजींनी जय पवार यांचा हात हातात घेतला आणि दिवंगत अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करणारी भावनिक कविता सादर केली. आजींच्या या कवितेतून अजितदादांप्रती असलेली त्यांची आत्मियता, जिव्हाळा आणि आदरभाव व्यक्त झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

अजितदादांनी आपल्या कार्यातून सर्वसामान्यांच्या मनात निर्माण केलेले स्थान, जनतेशी जोडलेली नाळ आणि त्यांच्या आठवणी आजही किती जिवंत आहेत, याची प्रचिती देणारा हा क्षण उपस्थितांना भावूक करून गेला.