चिपळूण : एमईएस एएम परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे धन्वंतरी पूजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन डॉ. राजेश सुपे आणि प्राचार्य डॉ. सचिन उत्पात यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपप्राचार्य डॉ. अमित पाटील यांच्यासह एमईएस एएम परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. धन्वंतरी पूजनाच्या माध्यमातून आरोग्यसेवेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी धन्वंतरी देवतेचे पूजन करून आरोग्यसेवेप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली.