खेड :- तालुक्यातील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचालित ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, मोरवंडे–बोरज येथील इयत्ता १२ वी CETचा विद्यार्थी आदित्य खापरे याने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर शासकीय शालेय राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या निवड चाचणीत यश संपादन करून, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
आदित्यच्या या उल्लेखनीय यशामुळे प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि क्रीडा नैपुण्याचे हे फलित आहे.
आदित्य खापरेला क्रीडाशिक्षक श्री. आशिष देशमाने आणि हर्षदा पार्टे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्याच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढ्ढा, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य, प्रशालेचे प्राचार्य श्री. भरत मोरे सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आदित्यचे अभिनंदन करून, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यशाची उंच शिखरे गाठता येतात.
ज्ञानदीप इंग्लिश मिडिअम स्कूल मोरवंडे-बोरजच्या आदित्य खापरेची शालेय राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी निवड…
