खेड : तालुका काँग्रेस आमच्या पक्षाची मिटिंग आज शनिवार दि. 26 सष्टेबर 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता कुंभारआळी येथील पक्षाच्या कार्यालयात तालुकाध्यक्ष श्री अजीमभाई सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खेड तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी श्री. इब्राहीम परकार तर खेड तालुका आय काँग्रेसच्या खाडीपट्टा महिला अध्यक्षपदी सौ. झिनत नाडकर हिची नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली.
या मीटिंगला श्री. फैसल देसाई, मुराद लाडघरकर, महामंद काझी, तौफिक पोत्रिक, इब्राहिम परकार, श्रीम. सीमा शिंदे (जाधव ), सौ, नाझिमा तांबे, सौ. कौसर मुजावर, सौ. झिनात नाडकर, श्रीम. सुवर्णा गमरे, या सभेमध्ये सौ. झिनात नाडकर यांची खाडीपाठ्ठा महिला अध्यक्ष, म्हणून निवड झाली. तसेच इब्राहिम परकार यांची तालुका उपाध्यक्ष म्हणून पत्र देण्यात आले. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. मिटिंगमध्ये उपस्थित सर्वांचे आभार जनरल सेक्रेटरींनी मानुन, मिटिंगची सांगता करण्यात आली.
खेड तालुका काँग्रेस आयच्या उपाध्यक्ष पदी इब्राहीम परकार तर खाडीपट्टा महिला अध्यक्षपदी सौ. झिनत नाडकर यांची नियुक्ती…
