सातारा : पुणे पदवीधर निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी जाहीर केली.

आज सांगली येथे पक्षाच्या वतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. प्रा. सोमनाथ साळुंखे हे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव आहेत तसेच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून अध्यापन करतात. उच्च विद्याविभूषित असलेले प्रा. सोमनाथ साळुंखे हे सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.

यावेळी प्रदेश सदस्य प्रा. नागोराव पांचाळ, ऍड. अरुण जाधव, उत्तम वनशिवे, जितरत्न पटाईत, दीपक डोके, प्रशांत इंगोले, कृष्णा देशमुख उपस्थित होते.