कर्जत – कर्जत तालुक्यातील रॉयल गार्डन मंगल कार्यालयामध्ये बुधवार दिनांक 30 सप्टेंबर 2026 रोजी क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड अलिबाग यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष भगवान दामू धुळे यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा हिराजी पाटील जूनियर कॉलेज कडाव यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
यावेळी कर्जत पंचायत समिती सभापती नमिताताई सुधाकर घारे, तहसीलदार धनंजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड, उपसभापती चित्रा ठाकरे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती नारायण डामसे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मारुती आडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ रायगड जिल्हा परिषद सदस्य बाबुशेठ उर्फ मारुती घारे, हुतात्मा हिराजी पाटील जूनियर कॉलेज कडावच्या प्राचार्या मनीषाताई बैकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ झाला.
या कुस्ती स्पर्धेचा अंतिम निकाल याप्रमाणे 14 वर्षे वयोगट मुले
35 किलो. प्रणित अमोल कुंभार – खालापूर- प्रथम क्रमांक
38 किलो. अंश गणेश घडशी- अलिबाग -प्रथम क्रमांक
41 किलो. दर्पण परसराम शिंगे -खालापूर- प्रथम क्रमांक
44 किलो. सुशील रुपेश पावशे -पनवेल- प्रथम क्रमांक
48 किलो. आर्यश श्रीकृष्ण कोळी -अलिबाग – प्रथम क्रमांक
52 किलो. श्रेयस चंद्रकांत शिंदे -खालापूर – प्रथम क्रमांक
57 किलो. आश्लेष सुभाष पाटील -अलिबाग -प्रथम क्रमांक
62 किलो. राज महेश पाटील- उरण- प्रथम क्रमांक
68 किलो. लव्य कमलेश जैन- महाड -प्रथम क्रमांक
75 किलो. राजू भक्त – उरण- प्रथम क्रमांक
14 वर्षे वयोगट मुली
30 किलो. आस्था सुनील नडवीरमणी -खालापूर -प्रथम क्रमांक
33 किलो. त्रिशा सुनील कांबळे -खालापूर -प्रथम क्रमांक
36 किलो. सौम्या धनेश थळी- उरण- प्रथम क्रमांक
39 किलो. काव्या निशांत म्हात्रे -उरण -प्रथम क्रमांक
46 किलो. लावण्या परसराम शिंगे -खालापूर -प्रथम क्रमांक
50 किलो. देवांशी शेंद्रे- खालापूर -प्रथम क्रमांक
54 किलो. रिमझिम लल्लन शर्मा – कर्जत -प्रथम क्रमांक
58 किलो. दुर्वा जयवंत ठाकूर -अलिबाग- प्रथम क्रमांक
सतरा वर्षे व वयोगट मुले ( फ्रीस्टाइल कुस्ती )
45 किलो. अतिश दिनेश राजभर -पनवेल -प्रथम क्रमांक
48 किलो. करण राजेश कातकरी- पनवेल -प्रथम क्रमांक
51 किलो. साईराज सुनील बालवडकर -तळा -प्रथम क्रमांक
55 किलो. अमित अंकुश ढेबे -पनवेल- प्रथम क्रमांक
60 किलो. सार्थक पांडुरंग खताते -महाड -प्रथम क्रमांक
65 किलो. प्राण जयेंद्र भगत रोहा -प्रथम क्रमांक
71 किलो. दुर्वेश लवलेश पाटील -अलिबाग- प्रथम क्रमांक
80 किलो.राय भावेश शशी- खालापूर- प्रथम क्रमांक
92 किलो. ओंकार सुनील जोशी -कर्जत -प्रथम क्रमांक
110 किलो. यश दिनेश मढवी- पनवेल- प्रथम क्रमांक
17 वर्षे वयोगट मुली
40 किलो. काव्या राजेंद्र मरागजे -खालापूर -प्रथम क्रमांक
43 किलो. काजल प्रविण कहार- खालापूर -प्रथम क्रमांक
46 किलो. स्वाती मधुकर हनुमंते -खालापूर- प्रथम क्रमांक
49 किलो. साक्षी सुनील मुसळे – खालापूर -प्रथम क्रमांक
53 किलो. राणी ईदल शहा – खालापूर – प्रथम क्रमांक
57 किलो. संस्कृती रवींद्र लबडे – कर्जत – प्रथम क्रमांक
61 किलो. क्षितिजा जगदीश मरागजे -खालापूर – प्रथम क्रमांक
65 किलो. श्रावणी रमेश जाधव- कर्जत- प्रथम क्रमांक
69 किलो. प्रणिती भरत शिंदे- खालापूर – प्रथम क्रमांक
73 किलो. समृद्धी शिवाजी लोभी -कर्जत- प्रथम क्रमांक
17 वर्षे वयोगट मुले (ग्रीको रोमन कुस्ती)
45 किलो. रिषभ राजेंद्र महाडिक -खालापूर – प्रथम क्रमांक
48 किलो. जित जितेंद्र भगत- अलिबाग- प्रथम क्रमांक
51 किलो. सोहम राजेंद्र गायकवाड- खालापूर- प्रथम क्रमांक
55 किलो. वृत्विक सुजित शिळदणकर -अलिबाग- प्रथम क्रमांक
60 किलो. श्रवण केतन म्हात्रे- अलिबाग- प्रथम क्रमांक
65 किलो.अभिजीत धर्मेंद्र पांडे -उरण – प्रथम क्रमांक
71 किलो. निसर्ग मंगेश पाटील -अलिबाग- प्रथम क्रमांक
80 किलो. अथर्व संचित वांजळे –तळा- प्रथम क्रमांक
110 किलो. शुभम नाबा पोरे- उरण – प्रथम क्रमांक
19 वर्षे वयोगट मुले ( फ्रीस्टाइल कुस्ती )
57 किलो. अविनाश विश्वनाथ वाघमारे- पनवेल- प्रथम क्रमांक
61 किलो. स्वराज शिवाजी श्रीखंडे -खालापूर – प्रथम क्रमांक
मिरन गुलाम पोरे- महाड- द्वितीय क्रमांक
65 किलो. मोहम्मद युनोस मुजफ्फर हुरझुक- महाड- प्रथम क्रमांक
70 किलो. वरद सुनील सांगले -अलिबाग- प्रथम क्रमांक
७४ किलो. वेदांत कुंदन शिंगे- महाड- प्रथम क्रमांक
19 वर्षे वयोगट मुले ( ग्रीको रोमन कुस्ती )
55 किलो. पार्श्व विकास भगत- अलिबाग- प्रथम क्रमांक
60 किलो. आराध्य सुधीर गावंड -उरण – प्रथम क्रमांक
72 किलो. मयूर राजेंद्र पडते- उरण -प्रथम क्रमांक
77 किलो. राज सुरेश पगार- तळा- प्रथम क्रमांक
97 किलो. जसवंत सिंग कडेच्या -उरण- प्रथम क्रमांक
130 किलो. काव्य मोदी- खालापूर -प्रथम क्रमांक
सर्व विजेत्या कुस्तीपटू पैलवानांना रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष भगवान दामू धुळे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते मेडल्स, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
