मंडणगड : देव्हारे पंचक्रोशी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक योगेश कुमार केसरे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत प्रा. केसरे यांच्या कार्याचे कौतुक केले.
या प्रसंगी देव्हारे ग्राम महसूल अधिकारी अमोल पाटील, उन्हवरे ग्राम महसूल अधिकारी नयन बोबडे, महसूल सेवक सुनीत गमरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रा. योगेश कुमार केसरे यांचा सेवा संकल्प अभियानांतर्गत सन्मान..
