चिपळूण : शहरातील गोवळकोट , गोवळकोट रोड , पेठमाप , उक्ताड या भागात मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी उद्या बुधवार दि . २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून आघाडीच्या पुढाकाराने साखळी उपोषण केले जाणार आहे अशी माहिती शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यक विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री.रईस अलवी यांनी दिले.
ते म्हणाले कि गेल्या अनेक महिन्यांपासून आम्हाला मचूळ पाणीपुरवठा होतो . यापूर्वी अनेकदा पालिका प्रशासनाचे लक्ष वेधूनही कोणताच उपयोग झाला नाही . त्यामुळे आम्हाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी नगरसेवक साजिद सरगुरोह यांच्या नेतृत्वाखाली आणि आघाडीच्या पुढाकाराने आम्ही चिपळूण पालिकेसमोर ( इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र ) येथे २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून साखळी उपोषणाला बसणार आहोत . या आंदोलनात सगळ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.