खेड :- येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) या शैक्षणिक संस्थेच्या कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव माध्यमिक विभाग या प्रशालेतील सहावीतील आयुष बाबासाहेब बनसोड व विघ्नेश प्रकाश जाधव या दोन विद्यार्थ्यांनी बालवैज्ञानिक पुरस्कार मिळविला आहे.
मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन मार्फत घेण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक प्रात्यक्षिक परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची पुढील मौखिक परीक्षा व कृती संशोधन ‘प्रकल्प – पृथ्वी प्रणालींमधील परस्परसंबंध आणि मानवी कृती’ या विषयावरील प्रकल्प निर्मितीकरिता निवड झाली होती. या दोन्ही परीक्षानंतर मुलाखत होऊन आयुष बाबासाहेब बनसोड या विद्यार्थ्यांना रौप्य पदक व विघ्ने्श जाधव या विद्यार्थ्याला ब्राँझ पदक प्राप्त झाले असून, या दोन्ही विद्यार्थांची बालवैज्ञानिक म्हणून निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना रागिणी जामकर, विनोद टेंबे, माधुरी लेले या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्याच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.