चिपळूण : नामवंत उद्योजक विजय उर्फ अण्णा कदम यांनी आज आमदार श्री. प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष श्री. प्रशांत यादव यांनी खास स्वागत केले.
शतप्रतिशत भाजप ही घोषणा घेऊन आमदार श्री. प्रमोद जठार यांनी रत्नागिरी जिल्ह्याकडे खास लक्ष देण्याचे ठरवले असून आज चिपळुणात नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार त्यांच्या उपस्थित करण्यात आला. यावेळी नामवंत उद्योजक श्री. विजय उर्फ अण्णा कदम यांनी भाजप पक्षाच्या कार्यप्रणालीवर विश्वास व्यक्त करीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी त्यांचे खास स्वागत केले. विजय कदम यांना योग्य मानसन्मान मिळेल व त्यांच्या अनुभवाचा पक्षाला नक्की उपयोग होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी चिपळूण शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी यांनीही श्री. कदम यांच्या प्रवेशामुळे भाजप मजबूत होणार, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा कोषाध्यक्ष आशिष खातू, चिपळूण शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, चिपळूण शहर प्रभारी विजय चितळे, जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य अभय चितळे, बँकिंग सेलचे संयोजक रत्नदीप देवळेकर, पंचायत राज व ग्रामविकास जिल्हा संयोजक नरेंद्र बेलवलकर, चिपळूण शहर उपाध्यक्ष निनाद आवटी, मीडिया जिल्हा संयोजक रुपेश आवले, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस कुणाल आंबेकर, शक्तिकुमार चव्हाण आदी उपस्थित होते.