गुहागर : लालपरीच्या वर्धापन दिनानिमित्त आज गुहागर आगारात केक कापून आणि लालपरीचे पूजन करून कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी वाचनालयाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच, गुहागर आगाराच्या पालक सौ. सोनाली कांबळे, आगारप्रमुख स्वप्नील शिंदे, इतर अधिकारी व तमाम प्रवासी उपस्थित होते.