मुंबई : मनसे नेते अमित ठाकरे यांनी नवी मुंबईतील सानपाडा परिसरातील वात्सल्य ट्रस्ट या अनाथालयातील लहान मुलींसोबत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी भावनिक आणि आनंददायी वातावरण पाहायला मिळाले.

नवी मुंबईतील सानपाडा येथील वात्सल्य ट्रस्ट या अनाथालयात आज खास उत्साहाचे वातावरण होते. मनसे नेते अमित ठाकरे यांनी येथे उपस्थित राहत लहान मुलींसोबत आपला वाढदिवस साजरा केला.

यावेळी अनाथालयातील मुलींनी अमित ठाकरे यांना गुलाबाचे फुल, शुभेच्छापत्र, पुस्तक तसेच त्यांची फोटो फ्रेम भेट म्हणून देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यानंतर अमित ठाकरे यांच्या हस्ते मुलींना शालेय दप्तर आणि खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे मुलींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
सामाजिक बांधिलकी जपत अशा उपक्रमांमधून समाजातील गरजू मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.