मोहोपाडा : येथील जनता विद्यालयाच्या प्रांगणात सकल हिंदू संमेलन संध्याकाळी पार पडले. प्रमुख पाहुणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह कृष्णगोपालजी होते. स्वागताध्यक्ष ह.भ.प. वामन महाराज भोईर यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे व मान्यवरांना तुळशीचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे कृष्णगोपालजी, ह.भ.प. वामन महाराज भोईर, ह.भ.प. सच्चिदानंद कांबेकर, देवेंद्र भोजने, डॉ. सागर कांबळे, रजनी गायकवाड, ललिता दळवी, ताई पवार उपस्थित होते. तर कार्यक्रमासाठी तालुका पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे, सरपंच उमाताई मुंढे, जि.प. सदस्या नेहा पारंगे, पंचायत समिती सदस्या अर्चना भोईर, माजी सभापती रमेश पाटील, माजी सभापती सचिन तांडेल, ग्रामपंचायत सदस्या रसिका राकेश खराडे, सदस्या प्रतीक्षा रोशन राऊत आदी मान्यवरांसह परिसरातील आंतरराष्ट्रीय बजरंग दलासह इतर हिंदू संघटना व शेकडो हिंदू समाजबांधवांची उपस्थिती होती. शेवटी ह.भ.प. सच्चिदानंद कांबेकर यांनी आशीर्वचनपर भाषण करून आभार व्यक्त केले. पसायदान गायनाने समारोप झाला.
