चिपळूण : कृष्णा सहकारी बँक लि. रेठरे बुद्रुक या बँकेचे अध्यक्ष तथा आमदार आणि भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आज भाजपाचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष तसेच वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांच्या खेर्डी येथील स्वामिनी निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक तसेच भाजपा चिपळूण ग्रामीण प्रभारी स्वप्ना यादव यांनी आमदार भोसले यांचे स्वागत केले.
यावेळी सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, वाशिष्ठी डेअरीचे संचालक महेश खेतले, प्रशांत वाजे, अविनाश गुडेकर, गणेश कदम, संदीप पाटील आदी उपस्थित होते.
