मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश राज्य मुख्य प्रवक्ते पदी सुरज चव्हाण यांची तर प्रदेश उपाध्यक्ष पदी सिध्दार्थ कांबळे यांची नियुक्ती आज जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या मान्यतेने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी सुरज चव्हाण यांची राज्य मुख्य प्रवक्ते पदी तर प्रदेश उपाध्यक्ष सिध्दार्थ कांबळे यांची ही नियुक्ती जाहीर केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, मुंबई अध्यक्ष आमदार झिशान सिद्दीकी, आमदार सना मलिक-शेख, प्रदेश उपाध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, पक्षाचे सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, युवक प्रदेशाध्यक्ष निखिल ठाकरे आदी उपस्थित होते.
