मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील 2 जिल्हा परिषद गट व 4 पंचायत समिती गणासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी एकूण 19 उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले असून 7 फेब्रुवारी 2026 रोजी निवडणुक मतदान प्रक्रीया संपन्न होणार आहे.त्याकरिता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रूटमार्च काढला.

निवडणुक निर्णय अधिकारी विरसिंग वसावे, व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी अक्षय ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या सर्व तयाऱ्या पुर्ण करण्यात आल्या आहेत. मतदान प्रक्रीयेत तालुक्यातील 55111 मतदार सहभागी होणार आहेत. (26411 पुरुष व 28700 स्त्री) मतदान प्रक्रीयेसाठी तालुक्यात 85 मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी 4 अधिकारी 1 शिपाई व 1 पोलीस कर्मचारी असे 6 अधिकारी या दिवशी कार्यरत राहणार आहेत. याशिवाय 1 पि आय.3 पी.एस.आय. नाशिक येथील 78 होमगार्ड, 10 स्थानीक होमगार्ड यांचा बंदोबस्ताकरिता समावेश आहे. 15 कोतवाल व पोलीस पाटील यांचीही मदत घेण्यात आली आहे. या शिवाय मतदात्यांसाठी 10 ठिकाणी सहाय्यक कक्ष उभे करण्यात आले असल्याची माहीती निवडणुक विभागाकडून मिळाली आहे. याशिवाय मतदान शांतता व भय मुक्त वातावरणात संपन्न व्हावे व निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढावी या करिता प्रशासनाने यंदा विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणावर तालुक्यात जनजागृती अभियानही राबविले आहे. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती

गणनिहाय उमेदवारी यादी खालीलप्रमाणे
जिल्हा परिषद गट बाणकोट 1
प्रताप घोसाळकर (शिवसेना)
प्रकाश शिगवण (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
सम्यक जाधव (बसपा)
जिल्हा परिषद गट भिंगळोली क्रमांक 2
अस्मिता केंद्रे (शिवसेना)
संतोष गोवळे (शिवसेना उ.बा.ठा)
जमीर माखजनकर (कॉंग्रेस आय)
इस्लामपुर पंचायत समिती गण 1
वैष्णवी टक्के (शिवसेना उ.बा.ठा.)
स्मिता थोरे (भाजपा)
प्रणाली चिले (शिवसेना)
भिंगळोली पंचायत समिती गण क्रमांक 2
दीपक मालुसरे (शिवसेना)
प्रवीण कदम (ऱाष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
वामन जाधव (शिवसेना उ.बा.ठा.)
अब्दुलकादिर बुरोंडकर (काँग्रेस आय)
बाणकोट पंचायत समिती गण क्रमांक 3
मुस्ताक मिरकर(राष्ट्रवादी कॉंग्रेस)
अनिल राटाटे (शिवसेना)
तुळशी पंचायत समिती गण क्रमांक 4
दीप्ती घडशी (शिवसेना)
रत्ना मोहिते (भा.ज.पा.)
रेश्मा जाधव (वंचीत बहुजन आघाडी)
मीरा कदम (शिवसेना उ.बा.ठा)

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY