मुंबई : हे तुमचेच संस्कार आहेत—हक्कासाठी जनता रस्त्यावर आली की गोळीबार करणारी तुमची परंपरा… भीमा कोरेगाव हिंसाचार आणि गोवारी हत्याकांड याची साक्ष देतात. त्यामुळे महिलांचा आक्रोश समजून घेण्याइतकी संवेदनशीलता तुमच्यात नाही, हे स्पष्ट आहे अशी प्रतिक्रिया भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्राताई वाघ यांनी व्यक्त केली.
आणि ग्रामीण महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा काढताय? आम्ही त्यासाठीच आणि अशा अनेक सामाजिक बदलांसाठी, ३३% राजकीय आरक्षणाची मागणी केली. कारण ग्रामीण महिलांचे प्रश्न महिलाच प्रभावीपणे सोडवू शकतात. पण त्या आरक्षणालाच तुमच्यासारख्या लोकांच्या सरंजामशाही मानसिकतेने अडवलं… आणि आज नैतिकतेचे धडे देता? लाज वाटली पाहिजे.
