जळगाव:- पवार कुटुंब हे कधीच पुरोगामी नव्हते अशी टीका भाजपचे नेते सदाभाऊ खोत यांनी केले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी खोत यांना चांगलेच सुनावले आहे. पुरोगामी विचार तुम्हाला झेपण्या पलिकडचे आहेत, त्यामुळे फार बाता मारून नका असा इशाराच त्यांनी खोत यांना दिला आहे.

रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून ही प्रतिक्रिया दिली आहे‌. त्या म्हणाल्या की, सदाभाऊ, तुम्ही ज्या पवार कुटुंबीयांवर बोलताय त्या कुटुंबाचा भाग आदरणीय अजितदादा पण आहेत, ज्यांचा प्रचार तुम्ही आणि तुमचे सवंगडी करत आहेत त्या आदरणीय सुनेत्रा वहिनी सुद्धा त्याच कुटुंबाचा भाग आहे.