चिपळूण : मौजे आकले येथील ग्रामस्थांच्या खाजगी जमिनीत वन विभागाच्या नावाखाली झालेल्या कथित बेकायदेशीर अतिक्रमणाच्या विरोधात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूणच्या वतीने आक्रमक भूमिका घेत संबंधित प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले.
चिपळूण तालुकाध्यक्ष श्री. बळीराम गुजर यांच्या नेतृत्वाखाली मा. तहसीलदार, विभागीय वन अधिकारी तसेच आलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी शहर प्रमुख श्री. सचिन उर्फ भैया कदम, उपशहर प्रमुख श्री. संजय रेडीज व श्री. राजू विखारे, शहर सचिव श्री. प्रशांत मुळये, विभाग प्रमुख श्री. गणेश फके व श्री. संतोष मिरगल, तसेच तालुका प्रसिद्धीप्रमुख श्री. सचिन चोरगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
