चिपळूण : भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक शुक्रवार (ता. २४) आणि शनिवारी (ता. २५) चिपळूण आणि रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे भाजपच्या युवा पदाधिकाऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष श्री. महाडिक यांच्या स्वागतासह इतर कार्यक्रमांची जय्यत तयारी करण्यात आली असून, या दौऱ्यामुळे युवा कार्यकर्त्यांना निश्चितच बळ मिळेल, असा विश्वास युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांनी व्यक्त केला. कृष्णराज महाडिक यांच्या चिपळूण आणि रत्नागिरी येथील दौऱ्यात आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राहुल पवार यांनी केले आहे.