लांजा : प्रती वर्षीप्रमाणे स़ंत तुकाराम महाराज मंदिर आगरगांव लांजा येथे चैतन्य वारकरी मंडळाने भव्यदिव्य असा भरगच्च कार्यक्रम करण्यांत आला.
प्रथम विणा स्थापन, पुजा, अभिषेक, सत्यनारायणाची पूजा,आरती,भजन, महाप्रसाद, प्रवचन,गाथा भजन, माऊली हरीपाठ, कीर्तन ह.भ.प.चंद्रकांत देवलेकर पालू,ह.भ.प.कृष्णाकांत कुंभार सागाव,ह.भ.प.दिपक रामाणे लांजा,ह.भ.प.रामदास नामे यांची कीर्तन झाली.मान्यवरांचे श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
ह.भ.प.कृष्णा कुंभार महाराज यांनी कीर्तनातून बोध करताना भरपूर प्रमाणात उपदेश केला.एका प्रसंगात असे सांगितले मणूष्य भरपूर काही कमवतो. पैसा, धनदौलत, गाडी,माडी,घर , बंगला शेती, बागायती एवढा कमवतो .पण मेळ्यानंतर त्याला जास्त वेळ सुद्धा घरात ठेवत नाहीत.त्याचे कपडे, अंथरूण, चपला,त्याची कोणतीही वस्तू घरात ठेवत नाहीत ती बाहेर फेकुन दिली जाते.मात्र सोन्याच्या वस्तू ,धन,दैलत, पैसा,यासर्व सोधून काढून घेतले जाते.त्यावस्तू घरात ठेवेले जातात .मात्र त्यांनी वापरलेल्या वस्तू घरात ठेवत नाहीत.असेअनेक दृष्टांत, सिध्दांत देवून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH