चिपळूण : आरोग्य क्षेत्रात सर्वत्र असणारी प्रशिक्षित मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेऊन चिपळूण येथील स्प्रिंग्स क्लिनिक अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे पेशंट असिस्टंट हा व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम आपल्या कोकणातील मुला मुलींसाठी सुरू करण्यात आला आहे. या कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून मर्यादित जागा उपलब्ध असल्याची माहिती इन्स्टिट्यूट तर्फे देण्यात आली.
विशेष म्हणजे, प्रथम प्रवेश घेणाऱ्या दहा उमेदवारांना या कोर्स साठी विद्यावेतन देण्याचा प्रस्ताव स्प्रिंग क्लिनिक तर्फे मांडण्यात आलेला आहे
रुग्णांची काळजी घेणे, रुग्णांना दैनंदिन सेवांमध्ये मदत करणे ,तसेच रुग्णालयातील विविध कामकाजात सहाय्य करणे, यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर या अभ्यासक्रमात भर देण्यात आला आहे. आरोग्य सेवा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे.
या प्रशिक्षणात अनुभवी डॉक्टर व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण, हॉस्पिटल इंटर्नशिपची सुविधा तसेच रुग्णालयाभिमुख अभ्यासक्रमाचा समावेश आहे. याशिवाय प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्लेसमेंट सहाय्य देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या कोर्सनंतर हॉस्पिटल, नर्सिंग होम, क्लिनिक, डायग्नोस्टिक सेंटर, ओल्ड एज केअर सेंटर, होम केअर सेवा तसेच परदेशातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे इन्स्टिट्यूट ने स्पष्ट केले आहे.
प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी स्प्रिंग्स क्लिनिक अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, जेड गार्डन, स्वर विहार, खेंड, चिपळूण येथे संपर्क साधावा. किंवा 9730906216, 7998494949, 9673956514, 7588477690 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन क्लिनिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
स्प्रिंग्स क्लिनिक अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये ‘पेशंट असिस्टंट’ कोर्स सुरू…
