चिपळूण : नेपाळ, काठमांडू येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय डान्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये चिपळूण तालुक्यातील विद्यार्थ्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या स्पर्धेमध्ये डायडाज डान्स स्टुडिओ, चिपळूण येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत भारतासाठी तब्बल 6 सुवर्णपदके आणि 1 रौप्य पदक पटकावत चॅम्पियनशिप ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.
या ऐतिहासिक यशाबद्दल या विजेत्या विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा रविवार, दिनांक 14 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. उदयजी सामंत उपस्थित राहणार आहेत.
तसेच या कार्यक्रमास चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. शेखरजी निकम, चिपळूण-गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. भास्करशेठ जाधव, माजी आमदार श्री. सदानंद चव्हाण, माजी आमदार श्री. रमेशभाई कदम, चिपळूण नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. संजय जाधव, नगराध्यक्ष श्री. उमेश सकपाळ, वरिष्ठ अधिकारी श्री. मंगेश पेडमकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रकाश बेले, प्रांताधिकारी श्री. आकाश लिंगाडे, तहसीलदार श्री. प्रवीण लोकरे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजयजी शिंदे तसेच चिपळूण शहरातील मान्यवर, नगरसेवक व विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
