चिपळूण : जल जागृती सप्ताह व जागतिक जल दिना निमित्त जलसंपदा विभाग रत्नागिरी, पंचायत समिती शिक्षण विभाग चिपळूण व अर्थ फाउंडेशन चिपळूण, यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 23 मार्च रोजी सकाळी ठीक आठ वाजता रामतीर्थ तलाव चिपळूण येथे रंग भरण, चित्र कला व वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे .

महाराष्ट्रात दरवर्षी १६ ते २२ मार्च या कालावधीत ‘जल जागृती सप्ताह’ साजरा केला जातो, ज्याचा समारोप २२ मार्च रोजी ‘जागतिक जलदिना’ने होतो. या सप्ताहाचा मुख्य उद्देश पाण्याचे महत्त्व पटवून देणे, जलसाक्षरता वाढवणे आणि पाण्याच्या काटकसरीच्या वापराबाबत जनजगृती करणे हा आहे. या सप्ताहाची प्रमुख कारण म्हणजे मार्च मध्याना पासून अनेक ठिकाणी पाण्याची वानवा होते त्यामुळे १६ मार्च ते २२ मार्च हा सप्ताह साजरा केला जातो. याचा प्रमुख उद्देश पाणी व्यवस्थापन, भूजल पातळी वाढवणे, पाण्याचे प्रदूषण रोखणे आणि लोकसहभागातून जलसंवर्धन करणे आहे या साप्ताहात राज्यभरात शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा आणि संस्थांमार्फत प्रभातफेरी, भित्तिचित्र, रांगोळी स्पर्धा, पथनाट्य, कीर्तन आणि भारूड यांसारख्या विविध कार्यक्रमांद्वारे जलजागृती केली जाते पृथ्वीतलावर व भुगर्भात पाण्याचा साठा कमी होत असल्याने आणि दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन, पाण्याचा जपून वापर करण्याबाबत जनजागृती करणे काळाची गरज आहे व या बाबी अगदी बालमनापासून विद्यार्थ्यांच्या मनात रुजाव्यात या उद्देशाने चिपळूण मध्ये या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.

चिपळूण शहर व 5 किमी येणाऱ्या बहुतांशी शाळा या स्पर्धेत सहभागी होत आहेत. इयत्ता पहिली ते चौथी च्या विदयार्थ्यां करीता रंगभरण स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेमध्ये विदयार्थ्यांना रेखा चित्र देण्यात येणार असून त्या मध्ये त्यांनी रंग भरावयाचे आहेत. तसेच पाचवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांना “पाणी वाचवा जीवन वाचवा”, ” जलप्रदूषण टाळा” व “पाण्याची साठवणूक व पुनर्वापर ” असे विषय देण्यात आलेले असून त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून चित्र काढून रंगवावयाचे आहे. कागद वगळता सर्व सामान विद्यार्थ्यांनी आणावयाचे आहे.

याच पद्धतीने वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार असून इयत्ता पाचवी ते सातवी च्या मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांना 1)”जल है तो कल है.” 2) जल संवर्धन आपली जबाबदारी 3)माझ्या कुटुंबाची पाण्याची गरज 4)कूप नलिकेचे पुनर्भरण व 5) देवराईचे गुपित असे विषय आहेत तसेच पाचवी ते सातवी उर्दू भाषे करिता 1) पानी का तहफ्फुज हमारी जिम्मेदारी 2) मेरे खानदान कि पानी की जरुरत 3)पानी बचाओ जिंदगी बचाओ 4)पानी कि आलूदगी 5) पानी के झरने और दरख्त व इंग्रजी भाषे करिता 1)Water Conservation 2)Save Water 3) Environmental Conservation 4)Ground Water 5)Water Pollution असे विषय देण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीने इयत्ता आठवी ते दहावी च्या मराठी भाषेच्या विदयार्थ्यांकारिता 1) पाणी प्रश्न व जैवविविधतेवरील आघात 2) सावधान पाणी पेटते आहे 3) छत्रपती शिवाजी महाराजांचे जल व्यवस्थापन 4) नदीचा आत्मा वन 5) भूजल साठ्यांचे नियोजन उर्दू भाषेच्या विद्यार्थ्यांकरिता 1) पानी कि अहमियत 2) जंगल कटाइ के नतीजे 3) पानी का इस्तमाल कल -आज और कल 4) बर्फ के पहाड पिघल रहे है ५) जेरे जमीन पानी कि सतहा तशविशनाक हद तक व इंग्रजी भाषे करिता विषय 1) Water issues and impacts on biodiversity 2) The water is turning flammable 3) Water Bankruptcy 4) Effects Of Deforestation 5)Domestic Pollution Of Water 5)Industrial Pollution Of Water असे विषय देण्यात आलेले आहेत. या सर्व स्पर्धे मध्ये प्रत्येकी प्रथम तीन व एक उत्तेजनार्थ असे क्रमांक काढण्यात येणार असून रोख रक्कम, सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे.
सदरहू स्पर्धा झालेवर त्याच ठिकाणी अकरा वाजता नगराध्यक्ष उमेश सकपाळ, पंचायत समिती सभापती सूर्यकांत खेतले, उपसभापती संदीप आयरे व उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर यांच्या शुभ हस्ते होणार आहे . सदरहू स्पर्धा यशस्वी करणे करीता श्री विपुल खोत उपविभागीय अभियंता जलसंपदा विभाग व त्यांचे अधिकारी, श्री दादासाहेब इरनाक गट शिक्षणाधिकारी, श्री दिपक यादव केंद्रप्रमुख खेर्डी व कळंबस्ते, अब्दुल रउफ सुर्वे केंद्र प्रमुख गोवळकोट उर्दू व त्यांची टीम तसेच अर्थ फाउंडेशन चे सर्व सदस्य प्रयत्न करीत आहेत.