चिपळूण : सामाजिक कार्यकर्त्या सुलभा मोहिते, मिरजोळी यांनी जि.प.मराठी शाळा मिरजोळी बौध्दवाडी या शाळेतील २२ विद्यार्थ्यांना स्कुल बॅगचे वाटप केले.
” या स्कुल बॅग वाटपामागिल उद्देश, जिल्हापरिषद मराठी शाळेत अधिकाधीक मुलांनी प्रवेश घ्यावा. मी, माझ्या पाल्याचा, खाजगी शाळेतून काढून या शाळेत प्रवेश घेतला. या शाळेला लाभलेल्या मुख्याध्यापिका मनिषा शेषराव गर्जे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ११ पट संख्येवरून २२ केली. विद्यार्थांचा पट वाढावा या साठी मी सदैव शाळेबाबत राहिन. शाळेने आपली मागणी मला सांगावी, त्या मागण्या पूर्णत्वास नेण्यासाठी मी प्रायोजक शोधेन.” असे आश्वासन या स्कुल बॅग वाटप कार्यक्रमात सुलभा मोहिते यांनी दिले.
मुख्याध्यापिका गर्जे मॅडमनी सुलभा मोहिते यांचे, स्कुल बॅग वाटप केल्याबद्दल आभार मानले. ” या शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी व माझा सहकारी शिक्षकवृंद कटिबद्ध आहे. ग्रामस्थांचे सहकार्यातून शाळेचा पट वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहु.” असे विचार आभार प्रदर्शन करीताना मुख्याध्यापिका गर्जेमॅडमने व्यक्त केले.
सुलभा मोहिते यांजतर्फे, मिरजोळी शाळेतील विद्यार्थांना स्कुल बॅगचे वाटप…
