मंडणगड : मंडणगड तालुक्यातील नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळावा, या उद्देशाने जिल्हा शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने बुधवार, दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी १० वाजल्यापासून मंगळवार पेठेतील श्री जय हनुमान मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे.
या आरोग्य शिबिरामध्ये नागरिकांची रक्तदाब तपासणी, शुगर तपासणी, जनरल आरोग्य तपासणी तसेच नेत्रतपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय आवश्यकतेनुसार नागरिकांना मोफत चष्मेवाटप करण्यात येणार असल्याने परिसरातील नागरिकांसाठी ही आरोग्यसेवा उपयुक्त ठरणार आहे.