दापोली : मुंबई व कोकणातील ठाणे रायगड पालघर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवार फक्त अध्यापनाचं काम करावं शिक्षण विभागाने कोणत्याही प्रकारचे माहिती मुख्याध्यापक व शिक्षकांकडून मागवण्यात येऊ नये असे आदेश शिक्षण संचालयाने निर्गमित केले आहेत.
मुंबई व कोकणातील पाचही जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे ऑनलाइन व ऑफलाइन माहिती शालेय शिक्षण विभागाकडून रोजच मागितली जात असल्याची तक्रार शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शिक्षण संचालकांकडे १९ ऑक्टोबर २०२६ रोजी केली होती या तक्रारीच्या अनुषंगाने आज शिक्षण संचालनालयाने मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक व कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांना लेखी आदेश देऊन मुंबईतील शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर पश्चिम व दक्षिण विभाग तसेच ठाणे रायगड पालघर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतरांकडून कोणत्याही प्रकारची ऑनलाइन व ऑफलाईन माहिती मागण्यात येऊ नये असे आदेश दिले आहे हे काम फक्त शनिवारीच करावं असे आदेश दिले आहेत
सरल, यु डायस आधार अपडेट मिड डे मिल यासह अनेक प्रकारची ऑनलाइन व ऑफलाइन माहिती शिक्षण अधिकाऱ्याकडून रोज मागितली जाते त्यामुळे शिक्षकांची अशैक्षणिक कामे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत शिक्षकांना फक्त अध्यापनाची कामे करू द्यावी यासाठी शालेय शिक्षण विभागाने माहितीचा वार शनिवार असं धोरण ठरवल्यावर सुद्धा सोमवार ते शुक्रवार अनेक प्रकारची माहिती शिक्षण विभागाकडून मागितली जाते
याबाबत मुंबई व कोकणातील अनेक शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या या तक्रारीच्या अनुषंगाने बोरनारे यांनी शिक्षण संचालकांकडे सोमवार ते शुक्रवार शिक्षकांना फक्त अध्यापनाचा काम करू द्यावं आणि शनिवार माहितीचा वार असावा या शालेय शिक्षण विभागाच्या धोरणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली होती
आजच्या आदेशामुळे शाळांमधील मुख्याध्यापक शिक्षकांनी सोमवार ते शुक्रवार पर्यंत कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नये तसेच शिक्षण अधिकाऱ्यांनी सुद्धा केवळ शनिवारीच माहिती बोलवावी असे आवाहन अनिल बोरनारे यांनी केले आहे.