दापोली : विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून कोंढे गावाच्या शैक्षणिक लौकिकात भर घालणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवीण शिंदे मित्र मंडळाच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कोंढे शाळा क्रमांक १, २ व ३ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा या उपक्रमात समावेश होता.
शिष्यवृत्ती परीक्षेत कोंढे शाळा क्रमांक १ मधील नम्रता तांबे, मुदिता कासारे व सांजवी शिगवण, शाळा क्रमांक २ मधील आराध्या करंजकर व साई गोरीवले, तसेच शाळा क्रमांक ३ मधील स्वरा भडवळकर व वेदा शिगवण हे विद्यार्थी पात्र ठरले. तसेच करंजाळी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झालेल्या एनएमएमएस परीक्षेत कोंढे येथील तनया शिवगण व मिहीर तांबे यांनी यश संपादन केले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप कासारे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, माजी सरपंच मारुती चिपळूणकर, माजी उपसरपंच प्रमोद रहाटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुबोध बोहिरे, माजी सरपंच राजाराम घोडेराव, विजय शिगवण, प्रवीण शिंदे मित्र मंडळाचे प्रवीण शिंदे, संतोष घोडेराव गुरुजी, नरेश कासारे, महेंद्र कासारे, विनोद रहाटे,यांचे सह तीनही शाळेतील शिक्षक,महिला, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो;- कोंढेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रवीण शिंदे मित्र मंडळाच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करताना मान्यवर.
कोंढेतील विद्यार्थ्यांचा प्रवीण शिंदे मित्र मंडळाकडून गौरव…
