चिपळूण : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी चिपळूण शहर मंडलातर्फे चिपळूण शहरातील बारा गरजू महिलांना घरघंटी आणि शिलाई मशीनसह स्वयंरोजगाराचे साहित्य वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम स्वामी बिल्डिंग, परशुराम नगर येथे पार पडला.
यावेळी चिपळूण शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, जिल्हा कोषाध्यक्ष आशिष खातू, नगरसेविका अंजली कदम, शहर सरचिटणीस सारिका भावे, उपाध्यक्ष नरेंद्र बेलवलकर, रुई खेडेकर, स्वाती देवळेकर, माजी नगरसेविका संजीवनी शिगवण, युवा जिल्हा सरचिटणीस कुणाल आंबेकर, इम्तियाज कडू, संगीता पालकर, अमेय सुर्वे, संदीप बोंडकर, मृणाल घटे, शक्तीकुमार चव्हाण, विनायक भैरवकर, संदीप आग्रे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिपळूण शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी यांनी केले. यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष आशिष खातू यांनी, भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यक्रम तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे आणि ते पोहोचवण्याचे काम चिपळूण शहर मंडलच्या वतीने केले जाते, असा विश्वास व्यक्त केला.
तर नगरसेविका अंजली कदम यांनी, भारतीय जनता पार्टी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदोदित कार्यरत राहील, असे मत व्यक्त केले. तसेच या स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सहकार्य करण्यात आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
उपस्थित सर्व गरजू महिलांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
