मंडणगड : शासनाने राबविलेल्या “सेवा संकल्प अभियान” अंतर्गत जि.प. शाळा कुडुक खुर्द शाळेने नुकतीच ऋषिप्रभा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आतखोल ला सदिच्छा भेट देण्यात आली. आणि तेथील कामकाजाची आणि उत्पादनाची माहिती घेतली. त्यावेळी मुलांनी खूपच आनंद घेतला. कंपनीच्या कारागिरांनी ही विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती दिली तसेच क्रेन च्या सहाय्याने लोखंडी जड वस्तू कशा उचलल्या जातात याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.. लहान वयातच एव्हढी मोठी कंपनी पहाता आली याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावरचा दिसून आला.
या भेटीदरम्यान कंपनीचे प्रोडक्शन इन्चार्ज श्री. किशोर सुतार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कंपनीचे कामगार श्री. जोतीराम सपकाळ आणि श्री. तुकाराम थोरात यांनी विद्यार्थ्यांना कंपनीची कार्यपद्धती, उत्पादन प्रक्रिया, पॅकिंग प्रकिया व सामाजिक बांधिलकी याबाबत सविस्तर माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत प्रश्न विचारले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी ऋषिप्रभा कंपनीचे आभार मानले. सेवा संकल्प अभियानाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये उद्योग क्षेत्राबद्दल जागरूकता निर्माण करणे हा असून, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञान मिळाल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली. संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनिल आईनकर,शिक्षक श्री साऊबा कोळेकर सर व ऋषिकेश उतेकर सर यांनी उत्तम नियोजन केले.
