चिपळूण: श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाची कु. वेदिका विष्णू हरवडे हीने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सुयश प्राप्त केले आहे. सदर स्पर्धा लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण यांच्या वतीने दि. ०१ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित केली होती. त्यामध्ये महाविद्यालयीन गटातून कु. वेदिका विष्णू हरवडे हीने उत्कृष्ठ सादरीकरण करुन सलग दुसऱ्या वर्षीही प्रथम क्रमांकास गवसणी घातली आहे. तिच्या यशासाठी कु. वेदिकाचे मार्गदर्शक प्रा. रुपेश भालेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशामुळे वेदिकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या, रजिस्ट्रार, पी.आर.ओ., सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुध्दा तिचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.💐💐💐💐