रोहा : वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट रोहा व द युनिक ॲकॅडमी पुणे संचलित सुनिल द.तटकरे स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी रोहा यांच्यावतीने युपीएससी- एमपीएससी स्पर्धा परीक्षा मोफत करिअर मार्गदर्शन सत्राचे रविवार ( ता. ५ ) रोजी सकाळी ११ वा. आयोजन करण्यात आले होते.या मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थी व पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पदवी काळात युपीएससी-एमपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी ? व इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी नंतर करियरच्या कोणत्या वाटा आहेत ? या विषयी पुणे येथील द युनिक ॲकॅडमीचे मार्गदर्शक दिनेश ताठे सर यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मौलिक मार्गदर्शन केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या सरळसेवा परीक्षा या संदर्भात दिनेश ताठे सर यांनी सविस्तर माहिती देत या उच्च परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सरकारी सेवेत हमखास रुजू होण्याची संधी मिळते असे मौलिक विचार देखील त्यांनी मांडले.पुढील सेमिनार रविवारी १२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता याच ठिकाणी होणार असल्याची माहिती देखील दिनेश ताठे सर यांनी दिली…
युपीएससी-एमपीएससी परीक्षा मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
