चिपळूण – श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे, श्री. आनंदराव पवार महाविद्यालय, चिपळूणच्या विद्यार्थ्यांनी माय भारत, रत्नागिरी आणि स्वामिनी सामाजिक कौशल्य विकास संस्था आयोजित “जिल्हास्तरीय कलागुण विकास स्पर्धेत” वत्कृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, स्वरचित कविता सादरीकरण स्पर्धा, सांघिक नृत्य स्पर्धामध्ये सहभाग नोंदवून उत्कृष्ठ कामगिरी करत यश संपादन केले आहे.

त्यामध्ये स्वरचित कविता सादरीकरण स्पर्धेत कु. वैष्णवी गजानन हळदे हिला प्रथम 🥇 क्रमांक, वक्तृत्व स्पर्धेत कु. वेदिका विष्णू हरवडे हिला व्दितीय 🥈 क्रमांक, चित्रकला स्पर्धेत कु. कुणाल नागेश जाधव याला व्दितीय 🥈 क्रमांक आणि सामूहिक लोकनृत्य स्पर्धेत प्रथम 🥇 क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच कु. वैष्णवी गजानन हळदे हिने स्वरचित कविता सादरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्यामुळे तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून सामूहिक लोकनृत्य स्पर्धेत प्रथम 🥇 क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींची सुध्दा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली असून त्या रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या पालकांसहीत सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या, रजिस्ट्रार, पी.आर.ओ., सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुध्दा तिचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.💐💐💐